Crimes : खुनाच्या प्रयत्नातील व फरारी तडीपार आरोपीस अटक.

पुणे.दिनांक २३.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ) पुणे शहरातील चंदन नगर येथे खुनाच्या प्रयत्नांच्या गुन्ह्यातील फरारी व तडीपार आरोपीच्या चंदन नगर पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस अंमलदार गणेश हांडगर हे रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग करत असतांना त्यांना एका खबऱ्या मार्फत माहीती मिळाली की. चंदन नगर येथील नागपाल रोडवरील मैदानावर त्यांनी सुफीयान शब्बीर खान.( वय २४.राहणार जितेश शाळे जवळ खादवे नगर. पुणे ) यास अटक करण्यात आली आहे
दरम्यान त्याच्या विरोधात चंदननगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ४४७\ २०२२.मध्ये भा. द .वी. कलम ३०७ .१२०.( ब ) क्रिमिनल लाॅ अॅमेनट मेन्ट अॅकट कलम ३.७.अन्वये गुन्हा असून तो गेली सहा महिन्यान पसून फरार होता. त्याला चंदननगर पोलीस स्टेशन मध्ये आणून गुन्हा रजिस्टर नंबर २७६\ २०२३.महाराष्ट्र अधिनियम कलम १४२.प्रमाने गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त पुणे शहर परीमंडळ ४.चे शशिकांत बोराटे. सहाय्यक पोलीस उपायुक्त येरवडा विभाग पुणे शहराचे संजय पाटील यांनी दिलेल्य सुचने प्रमाने चंदन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे .गुन्हे पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर. यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमारे. पोलीस उपनिरीक्षक दिलीप पावले. पोलीस अंमलदार सुहास निगडे. सचिन रणदिवे आविनाश संकपाळ. श्रीकांत शेंडगे. शिवाजी धांडे. महेश नाणेकर. अनुप सांगळे. नामदेव गडदरे. श्रीकांत कोद्रे. सुरज जाधव. शेखर शिंदे. सुभाष आव्हाड. विकास कदम. गणेश हांडगर यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.