येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.अर्धांगवायूचा झटका बसून रुग्णालयात मृत्यू : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील गारवा हाॅटेलच्या मालकाचा खून करणाऱ्या आरोपीचा येरवडा कारागृहात मृत्यू

पुणे दिनांक १३ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील पुणे ते सोलापूर महामार्गावर असलेल्या प्रसिद्ध हाॅटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांचा खून करणाऱ्या आरोपी बाळासाहेब खेडेकर याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.खेडेकर हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.१० सप्टेंबरला त्याला अचानक पणे अर्धांगवायूचा झटका आला होता.नंतर त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.आज सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान याप्रकरणांची माहिती अशी की पुणे ते सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे गावात गारवा बिर्याणी म्हणून प्रसिद्ध हाॅटेल आहे.तसेच आरोपी यांचे देखील अशोका म्हणून हाॅटेल आहे.या व्यावसायिक कारणांमुळे स्पर्धा होती यातून खेडेकर यांनी सुपारी देऊन गारवा हाॅटेलचे मालक रामदास आखाडे यांची हत्या १८ जुलै २०२१ रोजी घडवून आणली होती. या वेळी रामदास यांच्यावर तलवारीच्या सहाय्याने वार करून त्यांची हत्या केली होती.यामध्ये बाळासाहेब खेडेकर हा मुख्य आरोपी होता.यातील सर्व आरोपी विरुध्द खून व मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.तेव्हा पासून ते येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.दोन दिवसा पासून त्यांची प्रकृती अचानक पणे खालावली होती.उपचारा करिता ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आज सकाळी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.दरम्यान दोन दिवसातच मृत्यू झाल्यामुळे आता या प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळात आहे.बाळासाहेब यांचा मृतदेह आता पोस्ट मार्टम साठी नेण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.