निवडणूक प्रतिज्ञा पत्रात : गुन्ह्याची माहिती लपविण्याचा प्रकरणांमध्ये फडणवीस यांची निर्दोष मुक्तता

पुणे दिनांक ८ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी नागपूर येथील महानगर दंडाधिकारी यांनी आपला आदेश आज सुनावला आहे. व आज आपला आदेश दिला आहे.व या आदेशात सदर प्रकरणांमध्ये त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.याबाबत फडणवीस यांच्यावर सन १९९६ ते १९९८ मध्ये दोन गुन्हे दाखल झाले होते.मात्र त्यांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात ही माहिती लपवून ठेवली दोन्ही प्रकारणात त्यांना जामीन मंजूर झाला होता.परंतू त्यांनी २०१९च्या विधान सभा निवडणूकीत अर्ज भरताना त्यांनी या प्रकरणांची माहिती उघड केली नव्हती.असा आरोप फडणवीस यांच्या वर होता.
दरम्यान न्यायालयात फडणवीस यांचे वकील यांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाबद्दल माहिती देताना सांगितले की " लोकप्रतिनिधी कायद्या अंतर्गत गुन्हा सिद्ध होण्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या या प्रकरणांत सिध्द झालेल्या नाहीत.महानगर दंडाधिकारी यांच्या समोर सदर प्रकरणांची सुनावणी झाली होती.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने फडणवीसांची निर्दोष मुक्तता केली आहे",
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.