Crime : समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत १ लाख २ हजार रूपायांचे अंमली पदार्थ जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक२ ची कारवाई.

पुणे दिनांक ११जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी विषेश मोहिमे अंतर्गत समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ए. डी. कॅम्प चौका जवळील दुर्वेश सिट कव्हर दुकाना समोर अंमली पदार्थ विकणारा इसमास पोलीसांनी पकडून त्याच्या कडून १ लाख २ हजार रूपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव फैजल नईम गफूर मानकर ( वय २४.राहणार १२८८कसबा पेठ पुणे) असे आहे. पोलीस अंमलदार महेश साळुंखे यांना मिळालेल्या माहितीनुसार याला सापळा रचून अटक करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात समर्थ पोलीस स्टेशन मध्ये १५३\२०२३.एन. डी.पी.एस.अॅक्ट कलम ८ ( क) २२ ( ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व अंमली पदार्थ जप्त केले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त रितेश कुमार व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अप्पर पोलीस आयुक्त पुर्व पुणे शहर गुन्हे रामनाथ पोकळे. पोलीस उप -आयुक्त गुन्हे अमोल झेंडे. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर सतिश गोवेकर. यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे .पोलीस उपनिरिक्षक शुभांगी नरके .पोलीस अंमलदार महेश साळुंखे. संतोष देशपांडे. चेतन गायकवाड. सूर्यवंशी. साहिल शेख. जगदाळे. अझीम शेख. दिनेश बास्टेवाड. यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.