Charas : कात्रज भागात १० लाख २१ हजार रुपयांचा चरस जप्त अंमली विरोधी पथक २ च्या गुन्हे शाखेची कारवाई

कात्रज भागात अमली पदार्थ विभाग दोन गुन्हे शाखेने कारवाई करत चरसची विक्री करणाऱ्या भामट्या कडून एकूण १० लाख २१ हजार रुपायांचे १ किलो २१ ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त करुन एकास अटक केली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील अधिकारी व अंमलदार हे परिमंडळ - ५ मधील पोलिस ठाणेंच्या परीसरात दिनांक २३/१०/२०२२ रोजी पेट्रोलींग करीत असताना, पोलिस अंमलदार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक जण मांगडेवाडी कात्रज, पुणे येथे चरस हा अंमली पदार्थ विक्री करीता येणार आहे. मिळालेल्या बातमीवरुन अंगली पदार्थ विरोधी पथक - २, कडील पोलिस अधिकारी यांनी वरील परीसरात सापळा लावला असता, जाधवनगर, मांगडेवाडी, कात्रज, पुणे येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी एक जण संशईतरित्या थांबलेला दिसला. सर्फराज मुजफ्फर खान (वय - ३५, रा. साईसदन अपार्टमेन्ट, प्लॅट नं. १२ चौथा मजला, मांगडेवाडी कात्रज, पुणे व मुळपत्ता- मोहिते कॉलनी, कदमवाडी, कोल्हापुर) यास ताब्यात घेतले आहे. त्याची अंगझडती व सॅकबॅगची झडती घेतली असता, त्याचे ताब्यात १०,२१,०००/-रुकिचा ०१ किलो २१ ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ १०,०००/-रुकिचा मोबाईल संच व २००/-रुकिची सॅक बॅग असा एकूण १०,३१,२००/-रुकिचा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला आहे. त्याचेविरुध्द भारती विदयापिठ पोलिस ठाणे गु.र.नं.७०४/२०२२, एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८(क),२०(ब)(ii) (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्हयाचा तपास पोलिस उप-निरीक्षक एस.डी.नरके, अंमली पदार्थ विरोधी पथक-२ हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कारवाई ही पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त, संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त, गुन्हे, श्रीनिवास घाडगे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे-२, नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक - २, गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलिस निरीक्षक, सुनिल थोपटे, पोलिस उप-निरीक्षक, एस. डी. नरके, पोलिस अंमलदार संतोष देशपांडे, संदिप जाधव, प्रशांत बोमादंडी, आप्पा रोकडे, साहिल शेख, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, आझीम शेख, युवराज कांबळे व महिला पोलिस अंमलदार, दिशा खेवलकर यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.