Crime : पुण्यातील ताडीवाला रोड येथील तिंघानवर मोक्का अंतर्गत कारवाई. पुणे पोलिस आयुक्तांची ही आतापर्यंतची ४४ वी कारवाई

पुणे दिनांक ६ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुणे मधील ताडीवाला भागात गुन्हेगारी करणा-या तिंघाजणांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत मोक्का ची कारवाई करण्यात आली आहे. यातील आरोपींनी फिर्यादी हे जेवण करून रात्रीच्या वेळेस शतपावली करून मारुती मंदिर जवळ ताडीवाला रोड येथून घरी परत जात असताना फिर्यादी यांना भाव्या व त्यांच्या साथीदार यांनी त्यांना तू बाहेर चालला आहे. असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली. या बाबत फिर्यादीने विचारणा केली असता त्यांना शिवीगाळ केली व फायटरने मारहाण केली. या बाबत आरोपीच्या विरोधात बंडगार्डन पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २३२\२०२३ भा.दा.वी.कलम ३२६,३२४,३२३,५०४,५०६,३४,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्या नंतर पोलिसांनी त्यांना अटक करून त्याचा वर आता मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. सदरची ही मोक्काची आतां प्रर्यतची पोलिस आयुक्त पुणे रितेश कुमार यांची ४४ वी कारवाई आहे.
दरम्यान या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्यामाहितीनुसार मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपींची नावे या प्रमाणे आहेत १) संघर्ष उर्फ भाव्या नितीन आडसुळ ( वय २१) २) साहील राजू वाघमारे उर्फ खरखर सोन्या ( वय २२ दोघे. राहणार सारीपुत्त बुध्द विहारा जवळ नदी किनारी १३ ताडीवाला रोड पुणे) ३) अतुल श्रीपाद म्हस्कर उर्फ सोनू परमार ( वय २२ राहणार. शुरवीर चौक ताडीवाला रोड पुणे) अशी त्यांची नावे आहेत.
यातील आरोपी भाव्या यांने संघटित टोळी बनवून या भागात आपली दहशत निर्माण केली होती.त्यांच्यावर या वेळो वेळी या पूर्वी कारवाई केली आहे. पंरतु त्यांनी पुन्हा गंभीर गुन्हे केले आहेत. या बाबत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कायद्या अंतर्गत कारवाई बाबत बंडगार्डन पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संतोष पाटील. यांनी पोलिस उप-आयुक्त परिमंडळ पुणे २ श्रीमती स्मार्तना पाटील यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण कुमार पाटील यांना सादर करण्यात आला होता.या बाबत कागदपत्राची पडताळणी करून आरोपीची मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणी पुढील तपास लष्कर विभाग पुणे शहर सहा.पोलिस आयुक्त आर.एन.राजे हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार.सह आयुक्त संदीप कर्णिक. अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण कुमार पाटील. पोलिस उप-आयुक्त परिमंडळ २.श्रीमती स्मार्तना पाटील. सह.पोलिस आयुक्त लष्कर विभाग पुणे शहर आर.एन.राजे. यांच्या मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील. पोलिस निरीक्षक गुन्हे श्रीमती अश्र्विनी सातपुते सह.पोलिस निरीक्षक अभिजित जाधव. पोलिस उपनिरिक्षक रविंद्र गावडे.पोलिस उपनिरिक्षक राहुल नळकांडे. पोलिस अंमलदार तळेकर. राणे.घडे.यांनी केली आहे. पोलिस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार यांनी कार्यभार आपल्या ताब्यात घेतल्या पसून त्यांची ही आतापर्यंतची ४४ वी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पुणे शहरातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्या करिता सर्व कर्मचारी व अधिकारी यांना तसे निर्देश देण्यात आले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.