परिसरात गोंधळाचं वातावरण : इंडिया आघाडीच्या ' मी पण गांधी ' पदयात्रेत पोलिसांन कडून कार्यकर्त्यांची धरपकड

पुणे दिनांक २ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीच्या वतीने पदयात्रा काढण्यात येत आहे.या पदयात्रेत इंडिया आघाडीचे सर्वंच घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते यात सहभागी झाले आहेत.मेट्रो सिनेमा ते मंत्रालयाजवळील माहात्मा व गांधींच्या पुतळ्यापर्यत पदयात्रा काढण्यात येत आहे.दरमयान यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं आहे.त्याच बरोबर काहींना ताब्यात घेतले आहे.यावेळी कार्यकर्ते व नेते आक्रमक झाले.कार्यकर्ते यांनी जोर जोरात घोषणाबाजी केली आहे.
दरम्यान पोलिसांनी अडवल्यानंतर पदयात्रा सुरू झाल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले.त्या नंतर पोलिसांनी कार्यकर्ते यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.इंडिया आघाडीच्या या मोर्चा करीता वर्षा गायकवाड व सचिन अहिर.आदी नेते व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.संपूर्ण देशात सध्या ' फोडा आणि राज्य करा ' इंग्रजाचं राजकरण भाजप करत आहे.मुंबई व महाराष्ट्रात ज्या विद्वेषाच्या घटना घडत आहेत.याचा निषेध करत समाजात सदभावनेचा विचार रुजविण्याची गरज आहे.I.N.D.A आघाडी कडून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त ' मी पण गांधी ' हा नारा देण्यात येत आहे.इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांना अडवलं आहे.तर या पदयात्रेला परवानगी नसल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.