Crime : अभिनेत्री जया प्रदा यांना न्यायालयाने सुनावला ५ हजार रुपयांचा दंड व तुरुंगवासाची शिक्षा

पुणे दिनांक ११ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) हिंदी चित्रपट अभिनेत्री व रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई येथील न्यायालयाने ६.महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. रायपेटा.चेन्नई येथे त्यांच्या मालकीच्या चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात त्यांना ५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान हे चित्रपटगृह चेन्नई येथील राम कुमार व राजा बांबू हे चालवतात. या थिएटर मधील कामगारांना ईएस आय देण्यास व्यवास्थापन अपयशी ठरल्याने कर्मचारी यांना अनेक समस्या सुरू झाल्या व या समस्या बाबत त्यांनी न्यायालयात धाव घेतली.त्यानंतर अभिनेत्री यांनी या कर्मचारी यांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन दिले व सदरचा खटला फेटाळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली.यावर कर्मचारी व सरकारी विमा महामंडळाच्या वकिलांनी त्यांच्या अपीलवर आक्षेप घेतला . त्यानंतर अभिनेत्री जया प्रदा व या प्रकरणाशी संबंधित इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.व प्रत्येकाला ५ हजार रुपये दंड देखील भरण्यास सांगितले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.