Delhi CM : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्ला नायर नंतर चढ्ढा यांनाही अटक करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परत एकदा भाजप सरकारवर नव्याने तोफ डागली आहे. दिल्लीमधील अबकारी धोरणांच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळा प्रकरणी आता त्यांनी राघव चढ्ढा यांना अटक होऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे. आतापर्यंत आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांना यापूर्वी अटक करण्यात आलेल्यांने त्यांनीही भीती व्यक्त केली आहे.
त्यांनी याबाबत एक तसे एक टि्वट केले आहे त्यात ते म्हणतात राघव चढ्ढा यांची पक्षाने गुजरातच्या सह प्रभारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये प्रचारासाठी जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हे लोकांच्या निशान्यावर राघव चढ्ढा असून त्यांना देखील अटक करणार असल्याचे मी स्वतः ऐकले आहे. पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले की कोणत्या प्रकरणात ते काय करतील व काय आरोप घेतील हेही ते लोक ठरवत आहेत. यापूर्वी नुकतीच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जवळची माणले विजय नायर यांना दिल्लीतील एक्साईज पॉलिसी मधील कथित घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. व मनीष सिसोदिया देखील याच प्रकरणात आरोपी आहेत
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.