Crime : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नंतर यशोमती ठाकूर यांना जीवे ठार मारण्याची धमकी

  • संपादक : भरत नांदखिले
  • 01 Aug 2023 12:15:32 AM IST
Crime

पुणे दिनांक ३१ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) संभाजी भिडें यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक भुमिका घेतल्या नंतर चव्हाण यांच्या नंतर यशोमती ठाकूर यांना ट्विटर वरून मी धारकरी बोलतो आम्ही तुमची अवस्था दाभोळकर सारखी करू  अशी धमकी दिली आहे. या धमकी प्रकरणा नंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पोलिस संरक्षण दिले आहे. आज अमरावतीत काँग्रेस पक्षाच्याआमदार यशोमती ठाकूर ह्या आज संभाजी भिडें यांच्या विरोधात आंदोलन करणार होत्या त्याच  दरम्यान  त्यांना धारकरीने जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  

दरम्यान श्री शिवप्रतिस्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्या विरोधात आक्रमक भुमिका घेतल्या मुळे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काल जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्या नंतर त्यांना काल पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. त्या धमकीला २४ तास होण्याची आधी आज पुन्हा संभाजी भिडें यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणा-या आमदार यशोमती ठाकूर यांना ट्विटर वरून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या धमकीत तुमचा दाभोलकर करू असे त्यांना धारकरी नावाने धमकी देण्यात आली आहे.

या धमकी नंतर प्रतिक्रिया देतांना काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर ह्या म्हणाले की .सरकारला इशारा दिला माझ्या जीवाला काय बरेवाईट झाल्यास या संपूर्ण प्रकरणांला गृहखाते जबाबदार असेल अशा त्या म्हणाल्या आहेत या धमकी बाबत त्यांनी अमरावती पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Crime Amravati Crime News
Find Amravati News, Crime News, Amravati Crime News, latest Amravati marathi news and Headlines based from Amravati City. Latest news belongs to Amravati crime news, Amravati politics news, Amravati business news, Amravati live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

परखड वक्ते व डॅशिंग आमदार म्हणून ओळख : बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका
सोयाबीन कापूस व कांदा या प्रश्नावर गोयल.फडणवीस व तुपकर यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात रात्री झाली बैठक : शेतकरीवर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पीयुष गोयल व रविकांत तुपकर यांच्यात बैठक तुपकर यांनी दिला ८ दिवसांचा अल्टीमेटम
अपघाता नंतर वाहतूक व्यवस्था कोलमडली.वाहनांच्या रांगाच रांगा : मुंबई ते पुणे महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात बस चालक जागीच ठार तर १० प्रवासी गंभीर जखमी
कारचा आतील लाॅक न‌ उघडल्याने ८ जण अडकले : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात ८ प्रवाशांचा जळून दुर्दैवी मृत्यू.भरघाव कार डम्परला धडकून कारला लागली 🔥 आग
दोषी आढळल्यास तातडीने सेवेतून बंडतर्फ करण्याचे आदेश गृहविभागाला देण्यात आले. : ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्याशी ✋ हातमिळवणी करण्या दोषी पोलिसांना सेवेतून बंडतर्फ करणार , गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय पथकात १२ सदस्यांचा समावेश : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पाहाणी करीता केंद्रीय पथक येणार मराठवाडा दौऱ्यावर
दहशतवादाच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड देशभरात करणार होते बाॅम्ब ब्लास्ट : पुण्यातील दहशतवादी प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात NIA ची मोठी कारवाई! १० दहशतवाद्यांची धरपकड
शुक्रवारी रात्रीच्या वेळी लागली वसतिगृहाला आग : इराकयेथे विध्यापींठाच्या वसतिगृहाला भीषण आग, 🔥 एकूण १४ विद्यार्थी आगीत होरपळून मृत्यू तर १८ विद्यार्थी गंभीर रित्या जखमी

शहरातील बातम्या