सोलापूरात सुध्दा नाशिक प्रमाणे एमडी ड्रग्स फाॅक्टरी असल्या बद्दल "पोलिसांना "माहिती नाही? व येथे देखील मुंबई पोलिसांचीच छापेमारी : नाशिक नंतर सोलापूरात एमडी फॅक्टरीवर मुंबई गुन्हे शाखेची छापेमारी पथकाला सापडली डायरी

पुणे दिनांक १७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) नाशिक नंतर आता सोलापूर मध्ये देखील एमडी ड्रग्स फॅक्टरीवर मुंबई पोलिसांनी छापेमारी केली आहे.यात पोलिसांना एक डायरी सापडली आहे.सदरच्या डायरी मध्ये एमडी व मेफेड्रोन कसे बनवायचे फार्मुला आहे.व एमडी ड्रग्स विकणाऱ्यांची नांवे आहेत. यामधील मोबाईल व इतर पडताळणी पोलिस करत आहेत.मुंब्ई पोलिसांनी संबंधित कंपनी सील केली आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गुन्हे पोलिसांनी नाशिक नंतर सोलापूर येथील चिंचोली एमआयडीसी येथे एमडी ड्रग्स निर्मिती करणाऱ्या फॅक्टरीवर छापेमारी करून पर्दाफाश केला आहे.छापेमारीत पोलिसांनी १६ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ व १०० कोटी रुपयांचा कच्च्या माल जप्त केला आहे. यात एकूण ११६ कोटी रुपयांचा माल जप्त करुन ही फॅक्टरी सील केली आहे.या कारवाई मध्ये पोलिसांनी दोन सख्खे भाऊ राहुल गवळी व अतुल गवळी यांना अटक करण्यात आली आहे.हे दोघेजण दहावी नापास असून यापूर्वी हे दोघेजण एका केमिकल फॅक्टरीमध्ये काम करीत होते.एमडी ड्रग्स कसे बनवायचे यांचे प्रक्षिशण घेतले आहे.त्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी मध्ये ३० हजार प्रति महिना प्रमाणे २१ हजार स्क्वेअर फूट जागा भाड्याने घेतली होती.यांनी मुंबई मधील पश्चिम उपनगरात एमडी ड्रग्स विकल्याचे आता तपासात पुढे आले आहे. आता यामध्ये अजून कुणांचा सहभाग आहे का याचा तपास मुंबई गुन्हे शाखेचे पथक करत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.