Crimes : ओडिसा नंतर पश्चिम बंगाल येथे दोन माल गाडया एकाच पटरीवर मालगाडयाची टक्कर १६ डब्बे घसरले.

पुणे.दिनांक २५.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ) ओडिसा च्या घटने नंतर पून्हा एकदा रेल्वे प्रशासनांचा ' भोंगळा ' कारभार चव्हाटय़ावर आला असून पश्चिम बंगाल मधील ओंडा स्थानका जवळ एकाच पटरीवर दोन माल गाड्या आल्याने त्यांच्यात टक्कर होऊन मालगाडीचे एकूण १२.डब्बे पटरीवरून घसरले आहेत.
सूत्रांच्या द्वारे मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पश्चिम बंगाल मधील ओंडा रेल्वेस्थानका जवळ सदरचा अपघात झाला असून या अपघातात रेल्वे इंजिनचा चालक व असिस्टंट दोघेजण जखमी झाले आहेत. एका मालगाडीने दुसऱ्या मालगाडीला पाठीमागून जोरात धडक दिल्यने हा हा अपघात झाल्याचे घटना स्थळा च्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रथम दरशिचे म्हणने आहे. एकाच महिन्यांपूरवी ओडीसा मधील बालासोर मध्ये रेल्वे चा भीषण अपघातात होऊन निष्पाप ३००.प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. या अपघाता नंतर रेल्वेप्रशासनाने कोणताच धडा घेतलेला दिसत नाही.' रेल्वचा हा संपूर्ण कारभार रामभरोसे सारखाच नाहीना '? असे प्रश्न चिन्हच निर्माण झाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.