Accused Student : विद्यापीठ व्हिडिओ लिंक प्रकरणी आरोपी विद्यार्थीनीं नंतर तिचा प्रियकर युवक पण गजाआड

चंदीगड विद्यापीठामधील व्हिडिओ लिंक प्रकरणी सिमला येथून एका युवकाला अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणी मुलीला यापूर्वीच अटक केली असून आतापर्यंत या प्रकरणात अटक करण्यात येणाऱ्यांची संख्या दोन्ही झाली आहे.
या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अटक मुलीने वस्तीगृहातील मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून सिमलात राहणाऱ्या तिच्या प्रियकराला पाठविलेचा आरोप सदर मुलीवर असून. मात्र पोलीस व विद्यापीठ यांनी या विद्यार्थिनींचा दावा फेटाळला आहे. युनिव्हर्सिटीचे प्रो चान्सलर यांनी बोलताना सांगितले की सदर मुलगी फक्त स्वतःचे व्हिडिओ त्या युवकाला पाठवीत होती. दरम्यान कॉलेजमधील अन्य विद्यार्थ्यांनींचे म्हणणे आहे की. ती विद्यार्थिनी बाकीच्या विद्यार्थिनी ह्या आंघोळ करताना व कपडे बदलताना आमचे व्हिडिओ काढून सदर विद्यार्थिनीचा प्रियकर याला पाठवीत होती. त्यानंतर सदर युनिव्हर्सिटी मध्ये प्रचंड असा गोंधळ निर्माण झाला. व यावेळी विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे म्हणून गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी सदर प्रकरणी हस्तक्षेप करून गोंधळ घालणाऱ्या युवकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणातील सिमला येथून 23 वर्षे युवक सनी मेहता याला रोहरू येथून अटक केली आहे. तसेच सदरची विद्यार्थिनी देखील शिमल्यातील रोहरू येथील आहे.
या घटनेबाबत त्या विद्यार्थिनीने मोबाईल मधील या तरुणाचा फोटो दाखविला होता. असे पंजाब पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान ती मुलगी देखील या तरुणाला ओळखत आहे. विद्यार्थ्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतरच खरी माहिती कळेल असे पोलिसांच्या म्हणणे आहे. दरम्यान या घटनेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. पण दुसरीकडे विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर हे युनिव्हर्सिटीत काहीच झाले नाही म्हणून विद्यार्थी व विद्यार्थिनींवर दबाव आणत आहे. व युनिव्हर्सिटीची बदनामी झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच काही झाले नाही म्हणून त्यांचे रडगाणे कायम गात आहेत. पण काही झाले नाही तर शेवटी या विद्यार्थिनींचा प्रश्न आहे. पण या विद्यार्थिनी स्वतःहून आपली बदनामी का करून घेतील. याकडे पण पाहिले जाणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठ मधील विद्यार्थी अजूनही आक्रमक असून ते आंदोलन करीतच आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार सदरचे युनिव्हर्सिटी मधील विद्यापीठ दोन दिवस बंद राहणार आहे असे कळते आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही या घटनेबाबत ट्विट करत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
या घटनेला संबोधित करताना पंजाबचे शालेय शिक्षण मंत्री एचएस बैन्स यांनी ट्विट करून चंदीगड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि त्यांना आश्वासन दिले की दोषींना सोडले जाणार नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.