ज्यूंच्या धार्मिक स्थळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : कोची येथील स्फोटानंतर दिल्ली व मुंबई पोलिस हाय अलर्टवर, प्रत्येक ठिकाणी गुप्तचर संस्था झाली सक्रिय

पुणे दिनांक २९ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सकाळी नऊ वाजता केरळमधील कोचीतील कलामासेरी येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटानंतर दिल्ली पोलिस चांगलीच हाय अलर्टवर आली आहे.दिल्ली पोलिसांनी सांगितले की " स्पेशल सेल गुप्तचर संस्थांच्या सतत संपर्कात आहे.व कोणत्याही माहितीकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.गर्दीच्या ठिकाणी देखील सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.तसेच गर्दीच्या ठिकाणी विषेश काळजी घेण्याबाबत पोलिसांना सुचना देण्यात आल्या आहेत.
दिल्ली व मुंबईत हाय अलर्ट देण्यात आला आहे.तसेच ज्यूंच्या धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.केरळ राज्यातील कोची येथे झालेल्या स्फोटानंतर नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) आणि काउंटर एटीसीची टीम घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे.या स्फोटांमागे आयईडीचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.