पुण्यातील विश्रामबाग येथील घटना : एटीएम सेंटर मध्ये चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या पळून जातांना वाहतूक शाखेचे पोलिसांच्या सतर्कतेने दोन आरोपींचा आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक ७ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोघेजण एटीएम मशिनमधून पैसे चोरत असतांनाच चौकात वाहतूक नियोजन करणाऱ्या पोलिसांच्या सतर्कतेने दोन अट्टल परप्रांतीय चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.व त्यांच्याकडून ९ हजार ५०० रुपायांचा मुद्दमाल जप्त केला आहे.व त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान याबाबत विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी हे विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाहतूक नियोजन करत असतांना पोलिसांच्या लक्ष या एटीएमकडे गेले.तिथे दोघेजण चोरी करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.व त्यांनी या दोघा चोरट्यांना पकडून विश्रामबाग पोलिस यांच्या ताब्यात दिले आहे.हे चोरटे एटीएम मशीन प्लास्टिकच्या पट्टया टाकून रोख रक्कम चोरत असे .यांचा हा चोरीचा उद्योग बऱ्याच दिवसांपासून बिनबोभाटपणे सुरू होता.आज देखील ते चोरी करून पळून जाताना वाहतूक पोलिसांनी त्यांना अप्पा बळवंत चौकात पकडले.हे दोघे अट्टल चोरटे असून ते परप्रांतीय असून ते उत्तर प्रदेशातील आहेत.त्यांच्याकडील चोरीचे ९ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई ही वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी कांतीलाल बनसोडे.बालमुरलीकृष्ण चौहान.दीपक सोनवणे.व सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी पडोळे यांनी ही कारवाई केली असून.या प्ररकणी पुढील तपास विश्रामबाग पोलिस हे करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.