मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज नंतर आंदोलनकर्ते आक्रमक : जालन्यात लाठीचार्ज नंतर आंदोलक आक्रमक धुळे - सोलापूर महामार्गावर १२ शासकीय बस पेटवल्या

पुणे दिनांक १सप्टेबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे व अन्य १० जण उपोषणाला बसले होते आज सायंकाळी पावने सहाच्या सुमारास पोलिसांनी अचानक पणे लाठीचार्ज केल्याने जमाव पण आक्रमक झाला यात मोठ्या प्रमाणावर दगड फेक झाली.यात पोलिस व आंदोलक व गावातील नागरिक हे जखमी झाले.त्यानंतर आंदोलक संतप्त झाले व त्यांनी धुळे - सोलापूर महामार्गावर आंदोलन करत शासकीय वाहनं व अन्य वाहनं अशी एकूण १५ वाहनं गनिमी काव्याने पेटवून दिली आहेत.पोलिसांनी लाठीचार्ज व हवेत गोळीबार केल्याने आंदोलक आता उग्र झालेले आहेत.
दरम्यान धुळे - सोलापूर महामार्गावर अनेक बसेस जाळल्याने या मार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.वाहनाच्या रांगाच रांगा मोठ्या प्रमाणावर लागल्या आहेत.तर अनेक ठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.शांततेत चालेल्या आंदोलनाला पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आता आंदोलक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले आहेत.त्यानी आता उग्र रूप धारण केले आहे.यात राज्य सरकारचे म्हणणे आहे.की जरांगे व उपोषण कर्ते यांची तब्येत बिघडली होती म्हणून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलिस यंत्रणा गेली होती.तर उपोषण कर्ते यांचे म्हणणे आहे की आमची प्रकती ठिक आहे.आणी डॉ.आलेतर आमच्यावर इथेच सलाईन लावा व अशी आम्ही विनंती केली पण डी वाय एस पी खाडे म्हणाले मी जातो व नंतर आम्ही उपोषण मागे घेतले नाही म्हणून अन्य पोलिस फोर्स आणून . लाठीचार्ज केला.अशी माहिती उपोषण कर्ते जरांडे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे.तसेच गावातील लोकांना घरात जाऊन महिला व पुरुष यांच्या वर लाठीचार्ज करण्यात आला.यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी करीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तसेच जखमी झालेल्या पोलिसांना देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान यामध्ये जर उपोषण कर्ते यांना तब्बेत खालंवली म्हणून जर रुग्णालयात दाखल करायाचं होतं तर दोन दिवस एवढा मोठा पोलिस ताफा या गावात कशासाठी ठेवला होता.? व जर आंदोलन कर्ते स्वतः सांगत होते आमच्यावर इथेच सलाईन लावा डॉ.तुम्ही घेऊन आला आहे.असे म्हणत असतांना पोलिसांनी आंदोलकांचे काहीही न ऐकता कुणाच्या सांगण्यावरून लाठीचार्ज केला? हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो? दरम्यान आता घटना स्थळी औरंगाबाद विभागाचे पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण हे आले तसेच जालना जिल्हाधिकारी डॉ.श्रीकुष्ण पांचाळ जालना पोलिस अधीक्षक तुषार दोशी.हे घटना स्थळी आहेत.परिस्थिती चिघाळल्या मुळे राज्य राखीव पोलिस दलाच्या पोलिस फोर्स बंदोबस्ता साठी तैनात करण्यात येणार आहे.अशी सूत्रा द्वारे माहिती कळत आहे.आजच या गावातील दुकाने बंद ठेवली आहेत.दरम्यान या घटनेचा सर्वच राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध केला आहे.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक कर्ते यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.व या लाठीचार्जची संपूर्ण चौकशी केली जाईल व दोषी आसणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.