Crimes : तोतया मेजर नंतर आता सापडला तोतया नौदल अधिकारी सह तीघेजण गजाआड.

पुणे.दिनांक २१.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ) पुणे शहरात सापडलेल्या तोतया मेजर नंतर पुणे ग्रामीण भागात लोणवळा येथे तोतया नौदल अधिकारी सापडला असून आता पुणे शहर व पुणे ग्रामीण भागातील सर्वच तोतया अधिकारी पोलिसांच्या रडारवर आहेत.
दरम्यान पुण्यात मागील काही दिवसा पूर्वी दोन तोतया अधिकाऱ्याचे पितळ उघडे पडले असून. आता पून्हा एकदा पुणे जिल्ह्य़ातील लोणावळा पोलीसांनी एका नौदल अधिकाऱ्याची पोलखोल केली आहे.त्याचे नाव आकाश काशीनाथ डांगे. असे आहे व त्याचे दोन साथीदार जयराज चव्हाण व अभय काकडे. अशी आहेत. या तिघा जणांना ही पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. आकाश हा नौदलात कंमाडर पदावर नोकरीस आहे.असे सांगून लोणवळा व इतर भागातील मुलांना तो फसवत असे. लोणावळ्यातील आय. एन एस. शिवाजी येथे नोकरीचे आमिश दाखवून त्यांच्याकडून प्रतेकी ३.लाख रुपये घेत असे. अशीच रक्कम घेण्या साठी तो आला असता याच वेळी लोणवळा नेव्हल पोलीस टीम व लोणवळा पोलीस यांनी संयुक्त रित्या कारवाई करून या तिघांना ताब्यात घेऊन त्याच्या कडून १५.लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.