मंत्रालयात शेतकऱ्यांचे आंदोलन : संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचे मंत्रालयात आंदोलन अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक

पुणे दिनांक २९ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयात आक्रमक भूमिका घेतली आहे.अपर वर्धा कृती समितीचे वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे.तर मंत्रालयात लावलेल्या जाळीवर शेतकरी उतरले होते. आता या आंदोलनकर्ते शेतकरयांना पोलिसांनी बाहेर काढून त्यांना आणले असता आम्ही अनेक दिवसांपासून निवेदन देत आहे.पण आमचे निवेदन देत असून आमच्या मागण्या अजून मान्य होत नाही.म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहे.आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आमच्या मागण्या संदर्भात वेळ न दिल्यास उद्या आम्ही मंत्रालयाच्या गेट समोर वीष घेऊ असे संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले आहे.आता यासर्व शेतकऱ्यांना मुंबई मधील आझाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले आहे.
दरम्यान याप्रकरणी मागील १०३ दिवसांपासून आम्ही मंत्रालयात आमच्या मागण्या संदर्भात पाठपुरावा करत आहे.पण आम्हाला न्याय दिला नाही.असे अपर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.आम्ही आमच्या जमिनी या प्रकल्पाला दिल्या आहेत.याबाबतची शासनाच्या वतीने मोबदला दिला नाही व आमच्या मुलांना प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी दिली नाही.असे शेतकऱ्यांनचे म्हणने आहे.
दरम्यान याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की या आंदोलक शेतकरी वर्ग यांच्या मागण्या संदर्भात आम्ही सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून येत्या दहा दिवसांत त्यांच्या बरोबर चर्चा करुन त्यांच्या असलेल्या मागण्या आम्ही निश्चिंतपणे मार्गी लावू कोणताही शेतकऱ्यांनवर अन्याय केला जाणार नाही असे ते म्हणाले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.