Crime : समृध्दी महामार्गावर वाढत्या अपघात प्रकरणी आता इअर अँब्यूलन्स सेवा

पुणे दिनांक १२ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम ) समृध्दी महामार्गावर अपघाताची मालिका रोज सुरूच आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार हायटेक झाले असून आता या महामार्गावर एअर अँब्यूलन्स ची सुविधा चालू करणार आहे. या बाबत सरकारच्या वतीने अनेक एअर अँब्यूलन्स ची सुविधा पुविणा-या कंपन्या बरोबर राज्य सरकार चर्चा चालू आहे.
महामार्गावर अपघात झाल्यानंतर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ उपचारा करिता हॉस्पिटल मध्ये दाखल करण्या संदर्भात लवकरच एअर अँब्यूलन्स ची सेवा महामार्गावर उपलब्ध केली जाणार आहे. या साठी एअर अँब्यूलन्सच्या कंपनी बरोबर राज्यसरकार चे प्रतिनिधी यांची चर्चा चालू आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारा करिता हॉस्पिटलची सेवा मिळावी म्हणून राज्य सरकार नागपूर ते मुंबई दरम्यान असणारे खाजगी हाॅस्पीटल सोबत राज्य सरकार करार करणार आहे. अशी माहीती सुत्रांन कडून मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.