पुण्यातील येरवडा पोलिस खात्याची जमीन संदर्भ : मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवार यांचे स्पष्टीकरण

पुणे दिनांक १७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील येरवडा येथील पोलिस खात्याची जमीनीच्या लिलावा बाबत पालकमंत्र्यांनी निर्णय घेतला होता.माजी पोलिस आयुक्त व त्यावेळीचे तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नाव घेता अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते.त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान आज दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले की.सन २००८ मध्ये राज्य शासनाने काढलेल्या एका जीआर त्यांनी यावेळी सादर केला.यावेळी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की त्या बातमीशी व प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही.एका सेवा निवृत्त आयपीएस अधिकारी यांनी एक पुस्तक लिहिले आहे.आणी त्यात माझ्यावर आरोप केले आहेत.तसेच मिडिया मध्ये सर्वत्र बातम्या आल्या की अजित पवार अडचणीत त्यांच्यावर कारवाई करा.पण मी यात काहीही केले नाही. असा दावा अजित पवार यांनी केला आहे.याबाबत तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.असे अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.