समृध्दी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात अपघात : पुण्यावरून वर्ध्याला भरघाव वेगाने जाणाऱ्या कारला अपघात एकाचा मृत्यू तीन गंभीर रित्या जखमी

पुणे दिनांक १२नोव्हेंबर(पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातून वर्ध्याला भरघाव वेगाने जाणाऱ्या कारला शनिवारी रात्रीच्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील टोलनाक्यावर जवळ महामार्गावर पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेडिंग न दिसल्यामुळे कार चालकांने अचानकपणे ब्रेक अर्जंट लावल्याने कारने दोनदा पलटी होऊन झालेल्या अपघातात कार मधील एकाचा मृत्यू झाला आहे.तर तीनजण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील चौघेजण हे कार मधून वर्धाकडे जात असताना वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील महामार्गावर टोल प्लाझा जवळ पोलिसांनी बॅरिकेडिंग केले होते.पण कार ही भरघाव वेगाने जात असताना अचानक पणे कार चालकांने एकदम अचानकपणे अर्जंट ब्रेक लावले व कार चालकांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने दोन वेळा पलटी मारुन पलटली यात कौस्तुभ मुळे यांचा मृत्यू झाला तर अंकित गडकरी.कार्तिक निपोडे हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णांलयात उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे.तर संजय विलास गावंडे हे किरकोळ जखमी झाले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.