Case of possession of unlicensed pistol : विना परवाना पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी एका आरोपीला अटक

विना परवाना पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी एका आरोपीला अटक केल्याची घटना मंगळवारी (दि.२४) रात्री ८ वा. परंदवडी ता. मावळ जि. पुणे हद्दीत घडली. पोलीस नाईक समाधान फडतरे यांनी शिरगाव-परंदवडी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी फिर्याद दिली. बुधवारी (दि.२५) दुपारी आरोपीला वडगाव मावळ न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
संतोष पांडुरंग काटकर (वय ४८ रा. पारवडी ता. मावळ जि. पुणे) असे विनापरवाना पिस्तुल व काडतुसे बाळगलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त सूत्रांकडून आरोपी संतोष काटकर यांच्याकडे बेकायदा पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक समाधान फडतरे, समीर घाडगे व दिलीप राठोड यांनी परंदवडी हद्दीतील दिशा मंगल कार्यालयाजवळ सापळा लावून, आरोपी संतोष काटकर यांची झडती घेत असताना, संशयास्पद हालचाली दिसल्या आरोपी पळून जाण्याचा तयारीत असताना, त्याची अंगझडती घेतली तेव्हा, देशी बनावटीचा पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे मिळून आली.
बुधवारी (दि.२५) दुपारी वडगाव मावळ न्यायालयात आरोपी काटकर याला हजर केले असता, गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी गुरुवार (दि.२६) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार एल एस कोळी करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.