वीज पुरवठा बंद पडल्याने सुदैवाने कुंटुब वाचले सांगली जिल्ह्यातील घटना : घराला वीजेचा करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला संपविण्याचा प्रयत्न फसला पोलिसांचा तपास सुरू

पुणे दिनांक ४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी येथील एका 🏠 घराला वीजेचा करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेल्याची तक्रार अशोकराव शंकरराव निकम यांनी चिंचणी वांगी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध दिली आहे.
दरम्यान अशोकराव निकम हे वांगीतील शिवणी रोडजवळ वास्तव्यास आहेत.मध्यरात्री संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने जवळ असलेल्या उच्च दाबाच्या ट्रान्सफर्म मधून केबल जोडून घराच्या मागच्या व पुढच्या दोन्ही दरवाजांना करंट देण्याचा प्रयत्न केला आहे.असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.रात्री दिड वाजण्याच्या सुमारास चाफ ओढल्या नंतर तारांवर अचानक पणे लोड येऊन ट्रान्सफर्म जळाला व स्फोट होऊन आग 🔥 लागली मोठ्या आवाजांने निकम कुंटुब जागे झाले.दरम्यान रात्रीच्या वेळेस काही लोक मोठ्याने ओरडत होते.व रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन हे हल्लेखोर पळून गेले.असे त्यांनी माहिती दिली असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.