मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील : मराठा समाजाला दहशतवादी म्हणून दाखवण्यांचा प्रयत्न.मराठा संघटनांचा गंभीर आरोप

पुणे दिनांक २६ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाला दहशतवादी असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे केला आहे.संपूर्ण मराठा समाज हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे.कायदा व सुव्यवस्था बिघडवतो अशी विधाने करण्यामागे हे आंदोलन एका विशिष्ट दिशेने नेण्यांचा हा केविलवाणा त्यांचा प्रयत्न आहे.मात्र त्यांचा हा प्रयत्न सफल होणार नाही.असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान मराठा समाजाची आपलेला आरक्षण मिळावे ही आग्रही मागणी असून गुणरत्न सदावर्ते यांनी या मागणीला विरोध केला आहे.सदावर्ते मराठा समाजाबद्दल व त्यांच्या आरक्षणांच्या मागणी बद्दल करत असलेल्या वक्तव्यामुळे फुलंब्रीतील मंगेश साबळे नावाच्या व्यक्तीने सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली.मुंबईत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.साबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे.मरठा क्रांती मोर्चाने आपण साबळे यांच्या पाठीशी उभं राहणार आहे.व त्यांना लागेल ती कायदेशीर मदत मोर्चातर्फे देण्यात येईल असं जाहीर केलं आहे.दरम्यान सदावर्ते यांनी केलेल्या विधानाबाबत पाटील यांनी म्हटले आहे की मराठा समाजाला टेररिस्ट आहोत अशा चौकटीत उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.आमच्या मागण्या शांततेच्या मार्गाने मांडत आहोत.गाडी फोडणं चूक आहे.मात्र त्या कार्यकर्त्यांची भावना समजून घेणं गरजेचं आहे.
दरम्यान मंगेश साबळे यांने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला.त्या बद्दल मी निषेध करतो असं कृत्य करु नका जेणेकरून आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल कायदा हातात घेऊ नये.असे आवाहन पाटील यांनी केले आहे.मराठा क्रांती मोर्चा हा साबळे यांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहे.साबळे यांना पुर्णपणे कायदेशीर मदत करणाऱ्याची जबाबदारी मराठा क्रांती मोर्चा तर्फे केली जाईल. सदावर्ते प्रसिद्धी साठी नेहमी मराठा आरक्षणावर बोलत असतात असं पाटील यावेळी म्हणाले आहेत.राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे.त्याच्याकडे सरकारनं लक्ष द्यावे.अशा वृत्तीला विनाकारण संरक्षण देऊन विनाकारण व्हीआयपी कॅटेगरीत गणण्याचा प्रयत्न केला जात असून तो चुकीचा असल्याचे ते म्हणाले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.