मराठा आरक्षण महाराष्ट्रभर निदर्शने : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणासंदर्भात आज दुपारी महत्त्वाची बैठक

पुणे दिनांक ४सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण कर्ते व गावकरी यांच्यावर झालेल्या अमानूष लाठीचार्ज नंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात वणवा मोठ्या प्रमाणावर पेटला आहे. व उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काल सरकारच्या वतीने मार्ग काढण्यासाठी गिरीश महाजन गेले असता त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे.त्यामुळे आता सरकार खडबडून जागे झाले आहे. व दुपारी १२ वाजता मुंबई मधील सह्याद्री अतिथीगृह मध्ये तातडीने बैठक बोलावली आहे.
दरम्यान उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज पासून पाणी त्याग केला आहे.आज त्यांच्या पत्नी व मुलीनं त्यांची उपोषण स्थळी भेट घेतली.यावेळी त्यांच्या पत्नी व मुलीनं माध्यमाशी संवाद साधला.त्या वेळी त्या म्हणाल्या की सरकारने त्वरित आरक्षण द्यावे. तर मुलीने सांगितले की आज पासून पाणी त्याग केला आहे.ते खूप हाट्टि आहेत.आरक्षन घेतल्या शिवाय ते उपोषण मागे घेणार नाही.आमचा त्यांचा अभिमान आहे.ते समाजासाठी काम करत आहेत.दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज सरकार बैठक घेत आहे.या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस व मराठा आरक्षण समितीचे सदस्य व मंत्रीमंडळातील काही मंत्री उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान या बैठकीला मराठवाडा विभागीय आयुक्त व औरंगाबाद.हिंगोली.परभणी.अहमदनगर.जालना.नांदेड व लातूर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक व सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी देखील सहभागी होणार आहेत.दरम्यान या बैठकी साठी उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांना देखील बोलवण्यात आले आहे.असे सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.