मंडळांच्या दोंघा विरुध्द लष्कर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल : गणेशोत्सवाची वर्गणी कमी दिल्याच्या रागातून चहा स्टॉल धारकाला बेदम मारहाण पुण्यातील कॅप्म भागातील घटना

पुणे दिनांक २६ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात असताना गणेशोत्सवाची वर्गणी कमी दिल्याच्या रागा पोटी एका चहा वाल्याला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ च्या दोघा कार्यकर्तेनी बेदम मारहाण केली आहे.सदर घटना पुण्यातील कॅप्म भागात घडली आहे.या बाबत चहा विक्रेत्यांनी लष्कर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दोघा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कॅम्प भागातील एम जी रोडवर फिर्यादी गणेश संतोष पाटणे यांचे श्रीनाथ टी स्टॉल म्हणून दुकान आहे.या ठिकाणी मंडाळाचे पदाधिकारी हे वर्गणी करीता गेले असता यावेळी पाटणे १५० रुपये देत होते पण मंडळा च्या कार्यकर्ते यांनी १००० रुपयांची वर्गणी मागितली व त्यावरून पाटणे यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.या बाबत लष्कर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी निलेश दशरथ कणसे व अविनाश राजेंद्र पंडित या दोघां जणांन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.