Crime : महाज्योतीकडून घेण्यात आलेल्या युपीएससी पूर्व प्ररीक्षेतील गैरव्यवहाराबाबत चौकशीचे आदेश जारी

पुणे दिनांक २० ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) नागपूर मार्फत दिनांक १६ जुलै रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि दिल्ली येथे घेण्यात आलेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेश परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या तक्रारीच्या अंनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.
दरम्यान महाज्योतीने ई-निविदा प्रक्रिया राबवून निवडलेल्या एजन्सी मार्फत परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये एकूण १३ हजार १८४ उमेदवारांची १६ जुलै रोजी राज्यातील १०२ व आणि दिल्लीतील २ केंद्रावर संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा झाल्यावर काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अंनुषंगाने महाज्योती कार्यालयाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.