Crimes : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून एक आयटी इंजिनियर गजाआड. १३.जून पर्यंत पोलीस कस्टडी.

पुणे.दिनांक १२.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम)राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवेठार मारण्याचीधमकी. देणाऱ्या एका आयटी इंजीनियरचया. मुंबई क्राइम बॅचच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
सदर घटने बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहीती नुसार मुंबई क्राइम बॅचचे टीमने काल पुण्यात येऊन सदर आय टी इंजीनिअर सागर बर्वे ( वय ३४.राहणार पुणे)याला अटक करून त्वरित स्थानिक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १३.जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.नंतर त्याला पुढील तपासा करीता पोलीस मुंबईला घेऊन गेले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व जेष्ठ नेते शरद पवार यांना सोशल मीडीयावरून धमकी दिल्या प्रकरणी मुंबई तील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासा साठी अनेक पोलीस पथके तयार करण्यात आल्यानंतर या गुन्ह्य़ाचा तपास चालू होता. आय टी इंजीनिअर आरोपीची पोलीस कसून तपास करीत आहेत.
या गुन्ह्य़ात अजून कोणाचा सहभाग आहे का?आरोपींने का धमकी दिली. याचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत. पवार यांना सोशल मीडियावरून जीवेठार मारण्यची धमकी दिल्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आली होती.तसेच खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी च्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन धमकी देणाऱ्या टयूटर हॅडलवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर त्वरित मुंबई क्राइम बॅच पोलीस अॅक्शन मोड मध्ये येवून तपास केल्यानंतर अखेर आरोपीस अटक मुंबई क्राइम बॅचला यश आले. पोलीसांकडून तांत्रिक बाबीचा तपास केला. आय टी इंजिनियर सागर बर्वे हा तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून त्यांनेच दोन अकाउंट तयार केल्याचे पोलीसांना संशय आहे." नर्मादाबाई पटवर्धन ".या नावाने एक अकाउंट आहे.याच अकाउंट च्या पोस्ट मधून शरद पवार यांना उद्देशून " तुझा लवकरच दाभोळकर होणार. " अशी धमकी देण्यात आली होती. तर अन्य दुसर्या अकाउंट वरून 'सैरभ पिंपळकर 'नावाच्य टयूटर हॅडलवरून शरद पवार यांची तुलना औरंगाजेबा बरोबर तुलना करून आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.