कालच इमारतील नागरिकांना महानगरपालिकेची नोटिस : डोंबिवलीत जुनी इमारत कोसळली आहे.अनेक कुंटूंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

पुणे दिनांक १५ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) डोंबिवलीत तीन मजली जुनी इमारत कोसळली आहे.डोंबिवली मधील पूर्व भागातील आयरे दत्त नगर मधील आदिनारायण नावांची इमारत कोसळली आहे.आदिनारायण सोसायटी मधील ही इमारत बरीच जुनी आहे.त्यामुळे या इमारतीला कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या वतीने इमारत मधील रहिवासी यांना कालच ही इमारत सोडून दुसरीकडे स्थंलांतर करण्यास सांगितले होते.अशी नोटीस देखील कालच रहिवासी यांना बजावण्यात आली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.परंतू ही इमारत दुसऱ्या दिवशीच कोसळली आहे.
दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नोटीस नंतर काही रहिवासी यांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला तर या इमारती मधील काही नागरिक अद्याप याच इमारतीत राहत होते.या भागात पाऊस देखील सुरू आहे.व याच दरम्यान ही इमारत कोसळली आहे.या दुर्घटना नंतर अनेक नागरिक हे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. इमारत दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवान व महानगरपालिका प्रशासन व पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत.व दरम्यान बचाव पथकाडून बचाव कार्यासाठी सुरूवात झाली आहे.व प्रथम ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना ढिगारा बाजूला काढून बचाव कार्य चालू आहे.व रेस्कू ऑपरेशन सुरू केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.