Crime : टोमॅटो विकून ३० लाख रुपयांची कमई करणा-या आंध्रा तील शेतकर-याची हत्या. पैसा जीवावर ऊठला

पुणे दिनांक १४ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) सध्याच्या परिस्थितीत टोमॅटोचे दरांनी भाजीपाला मार्केट मध्ये एका किलो साठी तब्बल १५० ते १६० रूपये मोजावे लागतात त्या मुळे सर्व सामाने माणसांचे बजेट चांगलेच वाढले आहेत. याच वाढत्या बाजारात आंध्रा प्रदेशातील शेतकर-यांने महिन्या भरात तब्बल ३०.लाख रुपये कमविले .मात्र हिच त्यांची कमई त्याच्या जिवावर बेतली आहे. चोरीच्या उद्देश्याने त्याचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्या शेतक-याचे नाव नारेम चंद्रशेखर रेड्डी असे आहे.
सदरची हत्या ही बुधवारी करण्यात आली आहे. नारेम हे आंध्रा प्रदेशातील अन्नमाय्या जिल्ह्यातील बोडीमालाडीन्ने या गावात राहत होते. त्यांची टोमॅटोची शेती करत होते. जुलै या महिन्यात टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले व याचा फायदा नारेम यांना झाला .त्यांनी एका महिन्यात तब्बल ३० लाख रुपये कमविले होते. नियमित पणे ते दूध घालण्यासाठी सकाळी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांची गळा आवळून हत्या केली. व गावातील एका निर्जण स्थळी त्यांचा मृतदेह सापडला यात हातपाय दोरीने बांधून टाॅवेलच्या साहाय्याने त्यांचा गळा आवळ-यांत आला होता. सदरची हत्या ही चोरीच्या उद्देश्याने केली असावी असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.