Crime : भूलतज्ज्ञ ' डाॅक्टर तुम्ही पण ' अनेक भाषेचे ज्ञान पण निघाले ' इसिस ' समर्थक ( NIA) ने आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक २८ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुणे शहरात राष्ट्रीय तपास यंत्रणांने गुरूवारी कोंढव्यात छापा टाकून मोठी कारवाई करत एका उच्च शिक्षित भूलतज्ज्ञ डॉक्टरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या पूर्वी रात्रीच्या वेळी गस्तीत शास्त्रीनगर भागात बीट मार्शल यांनी १८जुलै रोजी दोन जणांना पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोघांचा हात जयपूर बाँबस्फोट प्रकरणी एन आय ए.च्या मोस्ट वाॅटेडच्या यादीतील महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान व महम्मद युनूस महम्मद याकूब साकी अशी या दोंघा जणांची नावे आहेत. त्याचा तपास एटीएस तपास करीत आहे.त्या नंतर आता राष्ट्रीय तपास संस्थेने ( एन आय ए) ने एका डाॅक्टरच्या मुसक्या आवळल्या आहेत.
राष्ट्रीयतपास यंत्रणा महाराष्ट्रातील ISIS नेटवर्कचा तपास करत आहे. या प्रकरणांत या आधी एकूण ४ जणांना अटक केली आहे. कालची अटक ही या प्रकरणातील ५ वी अटक आहे.पुण्यातील कोंढव्यातून डाॅक्टर अदनान अली सरकार वय ४३.भूलतज्ज्ञ असून यांना १६ वर्षाचा डाॅक्टर क्षेत्रात अनुभव आहे. त्यांनी एम डी पण केले आहे. त्यांच्या घराची तपासणी केली असता. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स .दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रे व इतर अनेक आक्षेपार्ह साहित्य सापडले आहेत. ते कागदपत्रे सील करण्यात आली आहेत.
दरम्यान डाॅक्टर अदनान अली सरकारने सन २००१ या वर्षांत पुण्यातील बी जे.शासकीय महाविद्यालयातून MBBS केले होते. त्या नंतर याच संस्थेत सन २००६ या वर्षांत MD एनेस्थीसिया ( भूलतज्ज्ञ) केले .ISIS समर्थक असलेला डाॅक्टर अदनान याला इंग्रजी. हिंदी. मराठी. व जर्मन भाषेचे उत्तम ज्ञान आहे. अनेक पुस्तकांमध्ये त्यांने लिखाण केले आहे. एन आय ए .कडून महाराष्ट्रातील ISIS नेटवर्कचा तपास प्रकरणात २८ जून रोजी पहिला गुन्हा दाखल केला होता. व ३ जून रोजी मुंबईतून ३ जण पुण्यातून १ अशी आता पर्यत अटक केली आहे. तर हा डाॅक्टर पुण्यातून अटक झालेला २ रा व्यक्ती आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.