Ankita Murder Case : अंकिता खून प्रकरणातील आरोपी पुलकित आर्यचे वडील आणि भाऊ यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी

उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील श्रीकोट येथे राहणारी 19 वर्षीय अंकिता भंडारी गंगा भोगपूर येथील वंतारा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. अंकिता १८ सप्टेंबरपासून बेपत्ता होती. रिसॉर्टचा संचालक पुलकित आर्य याच्यासह तीन सहकाऱ्यांनी अंकिताची हत्या केली होती. या प्रकरणी पुलकित आर्यसह तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. या हत्येतील मुख्य आरोपी पुलकित आर्य हा माजी राज्यमंत्री विनोद आर्य यांचा मुलगा आहे.
उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणात भाजपने मुख्य आरोपी पुलकित आर्यचे वडील आणि भावाची पक्षातून हकालपट्टी केली आहे. आरोपी पुलकित आर्यचे वडील विनोद आर्य हे माजी राज्यमंत्री राहिले आहेत. त्याचवेळी भाऊ अंकित आर्य यांना राज्यमंत्रिपद मिळाले. अंकित हे उत्तराखंड इतर मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्षही होते.
आरोपी पुलकित आर्यचे वडील विनोद आर्य म्हणतात की, जिल्हा प्रशासनाने चौकशी करावी आणि आमची चूक असेल तर कारवाई झाली पाहिजे. तत्पूर्वी, शनिवारी, 24 सप्टेंबर रोजी सकाळी, SDRF टीमला चिला शक्ती कालव्यातून अंकिताचा मृतदेह सापडला. या प्रकरणी सीएम पुष्कर सिंह धामी यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी आरोपी पुलकित आर्यच्या ऋषिकेशमध्ये बांधलेल्या वंतारा रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामावर पोलिसांनी बुलडोझर फिरवला.
सीएम चे ट्वीट
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.