Pune crime cleaning : मार्केट यार्ड मधील पीएम कुरियर कंपनीवर दरोडा प्रकरणी सात जणांना खंडणी विरोधी पथकाकडून अटक

मार्केट यार्ड भागातील गणराज मार्केट गाळा क्रमांक 11 मधील पीएम कुरिअर ऑफिसवर अज्ञात इसमांनी समान्य आत प्रवेश करून पिस्तूल मधून एक राऊंड फायर करून भर दिवसा दरोडा टाकून दुकानाच्या ड्रॉवर मधून 27 लाख 45 हजार रुपये चोरून नेल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथक एक गुन्हे शाखा पुणे शहर यांनी एकूण सात जणांना मावळ येथील एका फार्म हाऊस वरून अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
दरोडेच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे.,१) अविनाश उर्फ सनी राम प्रताप गुप्ता ( वय.२०. रा.२३०. मंगळवार पेठ पुणे ) २) आदित्य अशोक मारणे. ( वय २८. रा. रामनगर मनपा शाळेजवळ वारजे पुणे ) ३) दीपक ओम प्रकाश शर्मा. ( वय.१९. रा. राहुल नगर शिवणे पुणे ) ४) विशाल सतीश कसबे. ( वय.२०. रा.२३०. मंगळवार पेठ पुणे) ५ ) अजय बापू दिवटे ( वय २३. रा. श्रीराम चौक रामनगर वारजे पुणे ) ६ ) गुरुजन सिंह सेवा सिंह वीरक.( वय २२ शिवाजी नगर पुणे) ७ ) निलेश बाळू गोठे.( वय.२०. ड्रायव्हर रा.२००. एस आर एस स्कीम मंगळवार पेठ पुणे ) याप्रमाणे आहेत. यातील अन्य त्यांचे चार साथीदार फरार आहेत. अटक करण्यात आलेले आरोपींनी सदर गुन्हा कबूल केला आहे हे सर्वजण मार्केट यार्ड आतील कुरिअर ऑफिसवर शनिवारी बारा नोव्हेंबर रोजी भर दिवसा दरोडा टाकला होता व दरोडा टाकून २७ लाख ४५ हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यांनी गुन्हा कबूल केला . दरोडा टाकून हे सर्वजण मावळ येथील साई फार्म हाऊस मारवे गाव तालुका मावळ जिल्हा पुणे. येथे लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखा एक खंडणी विरोधी पथकाला खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सदरची बाब आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून वरील ठिकाणी जाऊन साई फार्म हाऊस वरून सात जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आरोपी यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले सात मोबाईल एक लोखंडी कोयता तीन दुचाकी व 13 लाख 43 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला आहे. व अटक आरोपींना पुढील तपासाकरिता मार्केट यार्ड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता.सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे. रामनाथ पोकळे. पोलीस उप आयुक्त गुन्हे. श्रीनिवास घाडगे. सहाय्यक पोलीस आयुक्त एक चे गुन्हे शाखेचे गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव पोलीस उपनिरीक्षक यशवंत ओंबासे पोलीस अमलदार मधुकर तूप सौंदर सयाजी चव्हाण प्रमोद सोनवणे संजय भापकर हेमा ढेबे. नितीन कांबळे किरण ठवरे दुर्योधन गुरव अमोल आवाड राजेंद्र लांडगे विजय कांबळे प्रफुल चव्हाण संभाजी गंगावणे यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.