Crime : पोलिस रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना आश्रय देऊन त्यांना पळून जाण्यास मदत करणां-या दोंघा जणांच्या खंडणी विरोधी पथकांने आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक १४ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) खूनांचा पर्यंत्न करणां-याचा गंभीर गुन्हा असणारे रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना आश्रय देऊन त्यांना पळून जाण्यास मदत करणां-या व लपून राहाण्या करिता २ आरोपींना खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी त्याचा मुसक्या आवळल्या आहेत .
अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या नावे १ ) शुभम प्रितम सारवान ( वय २७ राहणार. रूम नंबर १३ पी सी बी क्वाॅटर्स धोबी घाट शंकर शेठ रोड कॅम्प पुणे ) २) अजिम सलीम शेख ( वय २९ राहणार कॅलनी नंबर १० कासेवाडी पुणे ) अशी आहेत. या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी रेकॉर्ड वरील गुन्हेगार अॅलेक्स गवळी व त्यांचे १० ते १५ साथीदार हे लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा करून फरार आहेत त्यांच्या विरोधात लष्कर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १३४\ २०२३ अन्वये गुन्हा दाखल आहे. यांना लपून राहाण्यास व त्यांना पळूनजाण्यास मदत केल्याचे सिध्द झाले. या बाबत आता या दोंघा विरुद्ध लष्कर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान भविष्यात अशाच प्रकारे सराईत गुन्हेगारांना आश्रय देणां-या इसमांवर गुन्हे शाखा मार्फत कडक.कारवाई करण्यात येणार आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक .अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर रामनाथ पोकळे. पोलीस ऊप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे. सह पोलीस आयुक्त गुन्हे-२ सतिश गोवेकर. यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक - २ गुन्हे शाखा पुणे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर लष्कर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण. सह.पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे.पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत चव्हाण. मोहनदास जाधव. पोलीस अंमलदार विजय गुरव .प्रदिप शितोळे .संग्राम शिनगरे.सुरेंद्र जगदाळे. सैदोबा भोजराव.सचिन अहिवळे. अमोल पिलाने.चेतन आपटे .अनिल मेंगडे .इश्र्वर आंधळे. राहुल उत्तरकर .पवन भोसले. चेतन शिरोळकर. प्रदिप गाडे.किशोर बर्गे .व लष्कर पोलीस स्टेशन पुणे यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.