Anti Terrorist Squad : दहशतवादी विरोधी पथकाची ११ राज्यात छापेमारी! पुण्यात दोघांना अटक! एकूण १०६ जणांना अटक

राष्ट्रीय तपास यंत्रणा व अंमलबजावणी संचाल्या यांच्या संयुक्त तपास यंत्रणाने काल मध्यरात्री पासून ११ राज्यात एकाच वेळी पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पी एफ आय च्या ( Anti Terrorist Squad ) अनेक कार्यालयावर छापेमारी सुरू केली. यामध्ये पुण्यातील कोंढवा व हडपसर यांच्या कार्यालयावर छापेमारी करून काही कागदपत्रे जप्त करुन दोघा संशयीतांना अटक केली आहे.सुरक्षेच्या कारणा वरून पुण्यात सेंट्रल रिझर्व्ह फोर्स ची एक तुकडी तैनात केली आहे.महाराष्ट्रातून एकूण २०. जणांना तर देशभरात एकूण १०६ पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे.
पुण्यात अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे कयूम शेख व रजी अहमद खान अशी आहेत. या दोघांना अटक करून राष्ट्रीय तपास यंत्रणांने त्यांना पुढील कारवाईसाठी नाशिक येथे घेऊन गेले आहेत. देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथे काही दिवसांपूर्वी. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया पी एफ आय. चे सदस्य असलेल्या काही जणांवर यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. महाराष्ट्रातून आज मुंबई भिवंडी औरंगाबाद बीड मालेगाव परभणी पुणे कोल्हापूर नवी मुंबई असे एकूण ११ ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या कार्यालयावर छापे मारून एकूण वीस जणांना अटक केली आहे. तर देशभरातून १०६. जणांनहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळत असून पुण्यातील कोंढवा येथून अटक केलेला रिजवान हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या शाखेचा सेक्रेटरी होता. कोंढवा मधील एका इस्लामिक शाळेत रात्रीच्या वेळेस मीटिंग घेऊन या लोकांची खलबत्ते चालू असतात असे समजते या ठिकाणावरून दहशतवाद विरोधी पथकाने काही कागदपत्रे देखील जमा केली आहेत. सदरची कारवाई रात्रीपासूनच चालू होती ती आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संपली आहे.
सन १९९२. च्या दशकात बाबरी मशीद पाडल्यानंतर केरळमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी. संघटना स्थापन झाली होती तसेच याच संघटनांच्या माध्यमातून सी मी संघटना देखील महाराष्ट्रातून स्थापना झाली होती. या दोन्ही संघटना कट्टर इस्लामिक संघटना म्हणून त्यांचे कामकाज चालत होते. या संघटनेच्या माध्यमातून देशविघातक कृत्ये करण्यात येत होती. तसेच या संघटनांना बाहेर च्या इस्लामिक देशातून फंडीग होत होते. या संघटनेचे.देशविघाता कार्य मोठ्या प्रमाणात चालू झाल्यामुळे या संघटनांवर केंद्र सरकार व राज्य सरकार च्या वतीने बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी देखील कोंढव्यातून सी. मी . या संघटनेचे कामकाज चालू होते. त्यावेळेस देखील दहशतवादी विरोधी पथकाने अनेक कारवाया या भागात केल्या होत्या. सरकारच्या बंदी नंतर सिमी संघटना ही बंद झाली होती. परंतु पुढे याच भागात पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया.असे नाव ठेऊन कामकाज चालू होते. ही एक कट्टर इस्लामिक संघटना असून राजकीय नेत्यांची हत्या करणे. तसेच तरुणांची माथी भडकवणे.व देशविघातक कृत्ये करणे. बळजबरीने धर्मांतर करणे. केरळ राज्यामध्ये तर एकूण २३ लोकांचे धर्मांतर केले होते. असा या संघटनेवर आरोप आहे. दुबई मधून मोठ्या प्रमाणात टेरर फंडिंग या संघटनेंना होत होते. या फंडिंग चा वापर कोणत्या कारणासाठी केला जात होता याचा देखील तपास आता दहशतवाद विरोधी पथक करणार आहे. आज देशभरात पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया. या संघटनेवर झालेल्या छापेमारी नंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली.एन.आय.ए.चे संचालक व ए.टी.एस.चे संचालक व राष्ट्रीय सल्लागार अजित डोबाल व राष्ट्रीय गुप्तचर खात्याचे प्रमुख.यांच्या समावेत तातडीने एक बैठक दिल्लीत चालू आहे.
आज देशभरात सर्वत्र छापेमारी सुरू असून आज या छापेमारीत एकूण १०६ जणापेक्ष जास्त लोकांना अटक केली आहे.तर महाराष्ट्रातून २० जणांना अटक केली आहे.या सर्व जणांवर आरोप आहे.की. देशी विरोधात कारवाई करणे. व तरुणांचा देशाच्या विरोधात ब्रेनवाश करणे. याप्रमाणे आरोप या संघटनेवर आहे.परदेशातून या संघटनेला मोठ्या प्रमाणावर फंडिंग होते.ही संघटना पी एफ.आय.चे एकूण ३ लाख फॅमिली अंकाऔट आहे.या.अंकाऔटवर.कुवेत.बहरीन. दुबई. व अन्य देशातून या अकाउंटवर मोठ्या प्रमाणात फंडिंग होत आहे. आजचा छापा हा. केरळ कर्नाटक राजस्थान महाराष्ट्र तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगण दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश. इत्यादी राज्यात मध्यरात्रीपासूनच. राष्ट्रीय तपास यंत्रणा व अंमलबजावणी संचालनालय. यांच्या संयुक्त तपास यंत्रणा ने कारवाई करत महाराष्ट्रातून वीस तर देशभरातून १०६ पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे.व तसेच त्यांच्या कार्यालयांतून कागदपत्रे जप्त केले आहे.सन १९९३ साली राष्ट्रीय आघाडीतून केरळ मध्ये काम चालू होते.तसेच २००६ मध्ये सी. मी. या संघटनेवर बंदी घातल्या नंतर या दोन्ही संघटना ह्या नंतर पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया.च्या माध्यमातून देशभरात पून्हा एकदा सक्रिय झाल्या होत्या व त्यांचे कामकाज चालू होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.