Crime : पुण्यात दारू पिताना वाद वाढला .भाच्याचा पारा चढला व मामाच्या डोक्यात गज घातला व केली हत्या

पुणे दिनांक ४ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) कोंढव्यात दारू पितांना मामा व भाच्याचा वाद वाढला व भाच्याने रागाच्या भरात मामाच्या डोक्यात गज घालून केली हत्या. सदरची धक्कादायक हि घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे. सख्या भाच्यांने मामाचा खून केल्या प्रकरणी मुलाने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्या नंतर पोलिसांनी आरोपी भाच्याचा विरोधात आता गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या घटने बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. आंनद शंकरराव काळंगिरे ( वय ४५ राहणार हनुमान नगर पिसोळी पुणे)असे खून झालेल्या मामाचे नाव आहे. यात सखा भाचा सचिन राम एलनवाड ( वय २५ राहणार. हनुमान नगर पिसोळी पुणे. मुळ रा.खानापूर जि.नांदेड) असे आहे .याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी मयत यांचा मुलगा हनुमंत काळंगिरे याने कोंढवा पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. आंनद व त्याचा भाचा हे दोघेजण कोंढवा येथे दारू पीत असताना मामा व भाच्यात वाद झाला या वेळी चिडलेल्या भाच्याने सख्या मामाच्या डोक्यात गज घातला.यात जखमी झालेल्या आंनद याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारा दरम्यान आंनद याचा मृत्यू झाला आहे. त्या नंतर सचिन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बाबर हे करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.