मिनी बस मध्यरात्री रस्ता सोडून धरणाच्या बाजूला ६० फूट दरीत कोसळली : मध्यरात्रीच्या सुमारास भोरच्या वरंधा घाटात मिनी बस ६० फूट दरीत कोसळून भीषण अपघात चालकाचा मृत्यू चौघे प्रवासी जखमी

पुणे दिनांक ८ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) भोर- महाड मार्गावर वरंधा घाटात मिनी बस मध्यरात्री वारवंड ते शिरगावचा हद्दीत पुण्यावरून भोर मार्गे चिपळूणकडे जाणारी क्रंमांक एम एच ०८ एपी १५३० ही सतरा सिटर मिनी बस मध्यरात्री सुमारास ६० फूट दरीत कोसळून हा अपघात झाला असून या अपघातात बसचा चालक हा ठार झाला आहे.तर चार प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले आहेत.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा अपघात हा शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास झाला आहे.रात्रीचा प्रवासात बसचा चालक हा रस्ता सोडून धरण असणाऱ्या बाजूच्या रोडने जात असताना ही मिनी बस धरणाच्या बाजूला ६० फूट दरीत कोसळली व सुदैवाने ही बस धरणाच्या व पाण्याच्या बस पाच फूटा वर अडकली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.मात्र या अपघातात बसचा चालक अजिंक्य कोलते यांचा मृत्यू झाला आहे.बस मध्ये एकूण १० प्रवासी होते.या अपघातात चार प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना भोर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे.दरम्यान रात्रीच्या वेळी मिनी बस चालकाला रस्त्यांचा अंदाज न आल्याने या चालकाचा बस वरील ताबा सुटून हा अपघात झाला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.