Pune crime : कोथरुड पोलीस ठाणे परिसरात व सुतारदरा भागात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई

  • संपादक : भरत नांदखिले
  • 29 Sep 2022 03:15:53 AM IST
Pune crime

कोथरुड पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारा अट्टल गुन्हेगार ऋषीकेश राजेंद्र ठाकुर, वय 23 वर्षे रा. भुगांव, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याचे साथीदारांसह कोथरुड व सुतारदरा भागात कोयते चाकू या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दरोडयाचा प्रयत्न, घातक हत्याराने गंभीर दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत (  Pune crime ). मागील 05 वर्षामध्ये त्याचेविरूध्द 04 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन श्री.अमिताभ गुप्ता,पोलीस आयुक्त,पुणे शहर यांनी नमूद इसमाचे विरुध्द एमपीडीए कायदयान्वये मुंबई मध्यवर्ती कारागृह , मुंबई येथे 01 वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. त्याला स्थानबध्द करण्यामध्ये श्री. महेंद्र जगताप वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कोथरुड पोलीस ठाणेश्रीमती वैशाली चांदगुडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पी.सी.बी.गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.

मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणाया व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आजतागायत 78 गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Pune crime Pune Crime News
Find Pune News, Pune crime News, Pune Crime News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

Rajesh deshmukh : विधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन
Chandrakant patil : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
Art of Living : आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra concluded by hoisting the Tricolor at Lal Chowk : लाल चौकात तिरंगा फडकावून राहुल गांधीच्या 'भारत जोडो यात्रे'चा समारोप
Pathan Box Office- Day 4 : पठाण बॉक्स ऑफिस दिवस 4 कलेक्शन: शाहरुख खानच्या चित्रपटाने जगभरात ₹429 कोटी कमावले; भारतात सर्वात जलद ₹250 कोटी
Police Raid Gambling : जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला, १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Accident : कामशेतजवळ जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात
New Social Media Rules : नवे सोशल मीडिया नियम, मार्चपासून होणार लागू

शहरातील बातम्या