Criminal who terrorized the students : सिंहगड शैक्षणिक संकुलनात कोयत्याने दहशत माजविणाऱ्या सूत्रधाराच्या बीड वरून आवळल्या मुसक्या

सिंहगड शैक्षणिक संकुलनात कोयत्याने दहशत माजविणाऱ्या सूत्रधाराला भारती विद्यापीठात पोलिसांनी बीड मध्ये अटक केली. सदर सूत्रधाराचे नाव अर्जुन दळवी (रा.माणिकबाग, सिंहगड रोड ) असे आहे.
रात्री १० वाजण्याच्या सुमारास सिंहगड शैक्षणिक संकुल येथे अथर्व लाडके (२०, रा.सिंहगड व्हॅली, आंबेगाव बु.,पुणे ) हे मित्रांसोबत गप्पा मारत होते होते. त्यावेळी आरोपी करण अर्जुन दळवी आणि त्याचा साथीदार सुजित गायकवाड यांनी दहशत पसरविण्याच्या हेतूने हातात लोखंडी कोयता घेवुन, कोयता हवेत फिरवुन येणार्या-जाणार्या लोकांना धाक दाखवुन दुकानांचे शटरवर वार करून तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडयांवर कोयता मारून दहशत निर्माण करत होते. त्यावेळी परिसरात नागरिक सैरावैर होवून पळून गेली. आरोपींनी फिर्यादी अर्थवचा मित्र तन्मय ठोंबरे याच्या पाठीवर स्टुल फेकुन मारला. अर्थवच्या मानेवर कोयत्याने वार केले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार दळवीचा शोध घेत होते. पोलिस अंमलदार हर्षल शिंदे आणि धनाजी धोत्रे यांना दळवी हा बीडमध्ये लपुन बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस पथकातील उपनिरीक्षक धिरज गुप्ता, अंमलदार शिंदे, धोत्रे आणि सचिन गाडे हे आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. त्यांनी दळवीला बीड येथून ताब्यात घेवुन अटक केली आहे.
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहीरट,
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे,सचिन सरपाले, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे,
आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, आणि राहुल तांबे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.