Pune Crime : 1 वर्षापासुन मोक्याचा गुन्हयात फरारी आरोपीस अटक

युनिट-1 गुन्हे पुणे शहर चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे नवरात्र उत्सव 2022 अनुशंगाने हददीत पेट्रोलिंग फिरत असताना युनिटचे पोलीस अंमलदार यांना त्यांचे गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, कामशेत पो स्टे पुणे ग्रामीण गु र नं 341/2022 भादंवि कलम 395, 387, 504 व मोका मधील फरारी आरोपी पप्पु शिंदे हा आपले अस्थित्व लपवुन उत्तमनगर भागात राहत आहे, अशी खबर मिळाल्यावरुन पोलीसांनी त्याठिकाणी जावुन माहिती काढुन खात्री करुन आरोपी महेश ऊर्फ पप्पु विष्णु शिंदे वय 29 वर्ष रा. सध्या जुनी भाजी मंडई उत्तमनगर मुळगाव दत्त मंदीराजवळ कामशेत ता. मावळ जि पुणे यास ताब्यात घेवुन सखोल चौकशी करता तो गुन्हा दाखल झाल्यापासुन 1 वर्षापासुन फरार असल्याचे कबुल केले आहे. त्यास पुढील कारवाई करीता कामशेत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी मा.अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर, मा.संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा.रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त,(गुन्हे) पुणे शहर, मा.श्रीनिवास घाडगे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे , मा.गजानन टोम्पे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे - 1, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 1 कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार महेश बामगुडे, अजय थोरात, इम्रान शेख, विठ्ठल सांळुखे यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.