१४४ आरोपींना अटक २ हजार जणांनावर प्रतिबंधात्मक कारवाई : मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये जाळपोळ करून सार्वजनिक मालमत्तेचे ११ कोटी रुपयांचे नुकसान आरोपींकडून वसूल करणार

पुणे दिनांक ४ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यात व शहरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या ३० ऑक्टोबरला हिंसक वळण लागले .यात जमावाने आमदार प्रकाश सोळंके व संदीप क्षीरसागर यांचे घरे पेटवून देण्यात आली होती.व माजल गाव नगरपरिषद इमारतीला आग 🔥 लावण्यात आली होती.आता हे हिंसक वळण आंदोलनकर्ते यांना चांगलेच महागात पडणार आहे.यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान हे ११ कोटी रुपयांचे झाले असून ही वसूली आता यातील आरोपींच्या कडून वसूल करण्यात येणार आहे.अशी माहिती बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
दरम्यान ३० ऑक्टोबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरून संतप्त झालेल्या जमावाने बीड मध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करुन दगडफेक व जाळपोळ मोठ्या प्रमाणावर केली होती.यात अनेक सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.याबाबत पोलिसांनी १४४ आंदोलक यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.व २ हजार आंदोलंकावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.असे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी सांगितले आहे.तर आतापर्यंत ५०० लोकांची आतापर्यंत चौकशी झालेली आहे.दरम्यान काही राजकीय पक्षांच्या वतीने ही जाळपोळ पूर्वनियोजित असल्याचा आरोप देखील केलेला आहे.दरम्यान बीड मध्ये शासकीय कार्यालये.राजकिय पक्षाची कार्यलय व एसटी बसेला 🔥 आग लावणे व काचा फोडल्या होत्या.या संपूर्ण घटना जिल्ह्यात घडल्या होत्या. दरम्यान यात जाळपोळ करणारे हे बीड भागासह अन्य तालुक्यातील असल्याची माहिती आता समोर आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.