Crime : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जत मधील स्टुडिओ मध्ये गळफास लावून केली आत्महत्या

पुणे दिनांक २ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) जेष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज त्यांच्या कर्जत येथील एन डी स्टुडिओ मध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. या मुळे हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी चित्रपट क्षेत्रात कला दिग्दर्शक म्हणून एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
आजची सकाळ ही सिनेमा सृष्टीला धक्का देणारी आहे. आज सकाळी कर्जत येथील एन डी स्टुडिओचे मालक व सिने जेष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या याच स्टुडिओ मध्ये गळफास लावून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. या मुळे हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अनेक हिंदी व मराठी चित्रपटात कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले ते ५८ वर्षीय होते पोलिस यांना स्टुडिओ मधून फोन करण्यात आला आहे. सदरची आत्महत्या ही १० तासा पूर्वी आत्महत्या केल्यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोलिस घटना स्थळी पोहोचले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.