Accused arrested : एक वर्षापासुन फरार असलेला कुख्यात आरोपी आसिफ पटेल यास केले जेरबंद

अंमली पदार्थ विरोधी पथक-1 गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना,इनामदार चौक,गंगाधाम, आईमाता रोड,कॅफे कै च्या समोरील सार्वजनिक रोडवर पुणे येथे अंमली पदार्थ रेकॉर्डवरील गुन्हेगार आसीफ पटेल हा एका चार चाकी गाडी मध्ये संशईतरीत्या बसलेला दिसला.
त्यास ताब्यात घेवुन त्यांची व वाहनाची झडती घेतली असता,त्याचे ताब्यात 90,900/- रु किचे 06 ग्रॅम 060 मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), 45,000/- रू किचा एक मोबाईल हॅण्डसेट 5,00,000/- रू किची एक लेकपर्पल रंगाची महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही 500 मोटार कार, द्रवरुप स्वरुपातील 0.580 मिलीग्रॅम 1,000/- रू किचा एम.डी. हा अंमली पदार्थ, किं.रु.00/- रु चे 04 इंजेक्शन सिरींज असा एकुण 6,36,900/- रु किंचा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे.
त्यांचेविरुध्द बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.185/2022,एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क), 22(ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त,श्री.संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,श्री.रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे,श्री.श्रीनिवास घाडगे, मा.सहा पो आयुक्त,गुन्हे-1,श्री.गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक,1 गुन्हे शाखा,पुणे शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक,शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, योगेश मोहिते, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.