Crime : सहाय्यक पोलिस आयुक्ताने पत्नी व पुतण्याचा गोळी झाडून केला खून

पुणे दिनांक २४जुलै (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुण्यात अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नी व पुतण्याचा गोळी झाडून केला खून केला. व त्यांना गोळ्या घातल्या नंतर स्वतावर देखील गोळ्या झाडून घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.
दरम्यान ते पुण्यातील बाणेर परिसरात राहत होते. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी केलेल्या गोळीबारात ठार झालेल्यांची नावे १) मोनी गायकवाड ( वय ४४.रा.बाणेर पुणे) २) दिपक गायकवाड ( वय ३५ राहणार बाणेर पुणे) या प्रमाणे आहेत. तर स्वतावर भारत गायकवाड यांनी गोळी झाडून घेत जीवन यात्रा संपवली आहे. सदर गटनेची माहिती मिळताच चतुःश्रुंगी पोलीस घटना स्थळावर दाखल झाले आहेत. भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुंटूब हे पुण्यातील बाणेर परिसरात वास्तव्यास होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.