हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तिंघाविरुध्द गुन्हा दाखल दोंघे परप्रांतीय फरार : अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला अॅडमिशन मिळवून देतो असे सांगून आठ जणांना घातला कोट्यावधीचा गंडा

पिंपरी चिंचवड ४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम पुण्यातील अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला अॅडमिशन मिळवून देतो असे सांगून अनेक गरजू विद्यार्थ्यांनकडून पैसे घेऊन एकूण आठ विद्यार्थी यांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती येथील एका पालकांच्या वतीने हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी एकूण तीन जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील मुख्य आरोपी हे परप्रांतीय असून ते फरार झाले आहेत.या प्रकरणांची व्याप्ती वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला अॅडमिशन मिळवून देतो असे सांगून दोन परप्रांतीयांनी हिंजवडी आयटी पार्क असलेल्या भागात ऑफिस उघडून व स्थानिकांना या प्रकरणी हाताशी धरून व ऑफिस मध्ये १० ते १२ मुलींना कामा ठेवून महाराष्ट्रातील अनेक गरजूंना विद्यार्थ्यांना गंडा घातला आहे. याबाबत पोलिसांनी सिद्धार्थ रावत उर्फ शुभगसिंग जयबहादूरसिंग व विजेंद्र शर्मा हे दोघेजण परप्रांतीय असून तिसरी महिला सृष्टी काकडे असे असून परप्रांतीय दोंघांनी मिळून हिंजवडी आयटी पार्क परिसर असलेल्या भागात प्राॅपनिटी सर्व्हिसेस प्रा.लि.या नावाने ऑफिस उघडून फसवणूक केली आहे.आपले पितळ उघडं होताच त्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे.दरम्यान यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बारामती येथील एका पालकाने हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान यात फसवणूकीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आतापर्यंत सव्वादोन कोटी रुपयांची विद्यार्थी यांची फसवणूक झालेली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.