Crime : अतिक अहमद हत्याकांड प्रकरणांतील वकील गजाआड

पुणे दिनांक ३०( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) उत्तर प्रदेश मधील गॅगस्टार अतिक अहमद हत्याकांडप्रकरणी त्याच्या वकिलांना आता अटक करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनच्या द्वारे मिळालेल्या माहितीनुसार अतिक अहमद याचे वकील विजय मिश्रा यांनीच उमेशपाल सिंह याची माहिती दिली होती. पोलिसांनी विजय मिश्रा याला लखनऊच्या एका मोठ्या हाॅलच्या बाहेरून अटक केली आहे.
दरम्यान काही महिन्यांपूर्वी दिवसाढवळ्या उमेशपालची हत्याचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश मधील कायदा सुव्यवस्था वर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. या घटने नंतर अतिक अहमदला अटक केल्या नंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी विधानसभा मध्ये राज्यातील संपूर्ण माफिया राज संपवून टाकू अशी शपथ घेतली होती.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.