नांदेडच्या मेडीकल कॉलेजचे वैद्यकीय अधिष्ठाता यांना शौचालय साफ प्रकरणी : शिवसेना खासदार हेमंत पाटीलवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

पुणे दिनांक ४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णांलयात रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी शिवसेनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी या रुग्णांनालयाला भेट दिली होती.यावेळी रुग्णांनालयातील अस्वच्छता पाहून पाटील संतप्त झाले.व त्यांनी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ एस.आर .वाकोडे यांनाच चक्क स्वच्छतागृह साफ करायला लावले.आता हे प्रकरण पाटील यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत स्वतः वैद्यकीय अधिष्ठाता यांनी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे.
नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता बरोबर शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या गैरवर्तणूकी संदर्भात सेन्ट्रल मार्ड आक्रमक झाले आहे.शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी अन्यथा महिााराष्ट्रातील सर्व डॉक्टर आंदोलन करतील या घटनेने अधिष्ठाता यांचें खच्चीकरण झाले नसून तर संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टर यांच्यासाठी ही अपमानास्पद बाब आहे.व आंदोलनाचा इशारा दिला आहे.तर रुग्णांलयात झालेल्या आरोग्य व्यवस्था कोलमडल्यास सरकार जबाबदार राहणार आहे.असी भूमिका सेंट्रल मार्डच्या वतीने घेण्यात आली आहे.दरम्यान काल हेमंत पाटील यांनी केलेल्या कृत्याबद्दल अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हेमंत पाटील यांची ही कृती न्यायाला धरुन नाही.सरकारचे हे अपयश आहे . आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी नांदेड व छत्रपती संभाजी महाराज येथील घाटी रुग्णालयात झालेल्या घटना बाबत त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.आज काॅग्रेस व शिवसेना विरोधी पक्षनेते नांदेड व छत्रपती संभाजी महाराज नगर येथील घाटी रुग्णालयात भेट देणार आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.