Maharashtra Karnataka border dispute : बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला; महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद चिघळण्याची शक्यता

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा बेळगाव दौरा पुढे ढकलला जात असतानाही कन्नड रक्षा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी सीमेवर ठिय्या आंदोलन केल्याचे समोर आले. बेळगावातील हिरबागेवाडी टोल बुथवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. यामध्ये महाराष्ट्रातील ५० हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. कन्नड रक्षण वेदिका महाराष्ट्र विरुद्धच्या या आंदोलनामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावाद सुरू आहे. यावेळी कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे नारायण गौडा बेळगाव दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह हिरबागेवाडी टोलनाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले. तेथे आलेल्या ५० हून अधिक गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. कर्नाटक पोलिसांनी नारायण गौडा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. मात्र, पोलिसांनी न जुमानता आंदोलन सुरूच ठेवले आहे. काही लोक गाड्यांवर चढले आणि घोषणाबाजी केली. तसेच काही जण गाड्यांसमोर आडवे झाले होते. महाराष्ट्रातून गाड्या पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाकायवर महाराष्ट्राच्या पाच वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हा हल्ला करण्यात आला असल्याचे समजते. पुण्याहून बंगळुरूकडे जाणाऱ्या या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांवर चढून घोषणाबाजी केली आहे. तसेच गाड्यांच्या समोर जाऊन ते गाडीखाली देखील झोपले आणि महाराष्ट्रातील गाड्या पुढे जाऊ देणार नाही अशा आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.