Attack : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला

नवरात्र मध्ये दांडिया खेळण्याकरिता लावण्यात आलेल्या मांडव काढताना पार्किंगच्या मुद्द्यावरून झालेल्या किरकोळ वादा नंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल रॉय यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला झाला आहे.
सदरच्या हल्ल्याबाबत सूत्राद्वारे मिळालेली माहिती अशी की. डॉक्टर अनिल रॉय यांच्यासह तीन ते चार जण या हल्ल्यात गंभीरित्या जखमी झाले आहेत. गुरुवारी ६ ऑक्टोबरला रात्री काळभोर नगर येथे नवरात्री मध्ये दांडियां खेळण्यासाठी टाकलेला मांडव काढत असताना मांडव वाले व डॉक्टर रॉय यांच्या कुटुंबातील महिला सदस्य यांच्याबरोबर पार्किंगच्या मुद्द्यावरून किरकोळ भांडण होऊन बाचाबाची झाली होती. याचाच राग मांडव वाल्याला आल्याने त्याने फोनवरून अन्य काही साथीदारांना घटनास्थळावर बोलवून घेतले व व त्यांनी यावेळी डॉक्टर राॅय व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला.
या हल्ल्यात डॉक्टर रॉय व अन्य ७ ते ८ आज जण गंभीरित्या जखमी झाल्याचे समजत आहे. या मारहाणी प्रकरणी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले आहेत असे समजते
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.