Fake death certificate : बनावट मृत्यू दाखल्या द्वारे इन्शुरन्स कंपनीला 50 लाख रुपयांची टोपी घालण्याचा प्रयत्न, पुण्यातील बंटी बबली वर मुंबईत गुन्हा दाखल

मुंबईमधील कोटक लाइफ इन्शुरन्स या कंपनीकडे बनावट मृत्यू दाखला व अन्य बनावट पेपर सादर करून. तब्बल पन्नास लाख रुपये विम्याची रक्कम घेण्याचा अयशस्वी प्रयत्न प्रकरणी मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी पुण्यातील बंटी बबली विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या बंटी बबली ची नावे. प्रकाश रामचंद्र माने ( वय ३६. रा.पुणे) व मयुरी प्रकाश माने. ( रा.पुणे ) याप्रमाणे आहेत फसवणूक प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की. या बंटी बबलीने एक एक रंजक खोटी स्टोरी रचून प्रकाशाच्या नावाने एक एक्सीडेंट पॉलिसी ऑनलाईन घेऊन त्याला विमाधारक दाखवून त्याचा रोड अपघात मृत्यू झाल्याचे सांगितले. परंतु सदर कागदपत्राची विमा कंपनीने पडताळणी केली असता दाखल करण्यात आलेले सर्व कागदपत्र हे बनावट असल्याचे दिसल्यानंतर. याप्रकरणी कोटक लाई फ इन्शुरन्स ने मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या बंटी बबली वर गुन्हा दाखल केला आहे.
कोटक लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या फिर्यादीनुसार आरोपी प्रकाश रामचंद्र माने यांनी जानेवारी २०२२ ला कंपनीच्या वेबसाईटवरून २५. लाख रुपयांचा ई- टर्म - प्लॅन. घेतला होता. या प्लॅनमध्ये जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याला.२५. लाख रुपये. याव्यतिरिक्त संरक्षण देखील होते. याचाच फायदा घेत झटपट श्रीमंत होण्यासाठी या दोघांनी. मानेचा मृत्यू झाल्याचे दाखवून त्यात त्याची पत्नी मयुरी ही एकमेव लाभार्थी. ( नॉमिनी ) दाखविले होते. त्याच अनुषंगाने मयुरी हिने रचलेल्या स्टोरीनुसार १५. मार्च २०२२. ला. म्हणजे साधारण अवघे तीन महिन्या त ज्ञात कंपनीला माहिती दिली की तिचा पती प्रकाश याचे रोड एक्सीडेंट मध्ये मृत्यू झाला आहे. व त्यानुसार तिने.५०. लाख रुपये इन्शुरन्सच्या रकमेसाठी दावा करून तिने अर्जासोबत पतीचा मृत्यू प्रमाणपत्राची झेरॉक्स कॉपी. पोस्टमार्टम चा रिपोर्ट. एक्सीडेंट च्या चौकशी पंचनामा. तसेच घटनास्थळाचा पंचनामा.गुन्हा. यासारखी सर्व लागणारी संबंधित कागदपत्रे दाव्या साठी लागणारी सर्व कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीकडे दाखल केली होती. तसेच तपशील फार्म देखील गावातील पोलीस पाटील यांनी दिलेले प्रमाणपत्र व तसेच प्रकाश माने यांच्या वडिलांनी पुणे जिल्ह्यातील सासवड पोलीस स्टेशन मध्ये दिलेले निवेदन अधिक कागदपत्र या सर्वांचा यात समावेश होता.
दरम्यान " कोटक लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या लीगल टीमच्या विभागाने या दाव्यासाठी जोडण्यात आलेल्या सर्व पेपरची योग्य अशी पडताळणी केली असता. या दाव्यासाठी देण्यात आलेले सर्व पेपर हे. बनवत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर या दोघा पती-पत्नीने आमच्या कंपनीची.५०. लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची स्पष्ट झाले." त्यानंतर इन्शुरन्स कंपनीने दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार वाजा निवेदन दिले. त्याच तक्रारीनुसार पोलिसांनी माने व त्याची पत्नी या दोघांना विरुद्ध फसवणूक प्रकरणी. एफ आय आर दाखल केला आहे. व सदर फसवणूक प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.